मी कधी नाही नाकारला
गुलाब सुद्धा मी नेहमी
काट्यांसाहित स्वीकारला
******************************
चंदनाने झिजावे ,
गुलाबाने रिझावे ,
हे त्यांचे कामच आहे,
काट्यावर चालून न विव्हलता,
पुढे जाणे,हा मानवाचा धर्म आहे.
******************************
निघून जाइल पायात रुतलेला काटा
जखम ही भरून जाईल
पण मनाचं जर रुतला काटा
तर मी मरून जाईल
******************************
मरनाच काय घेउन बसलास,
लोक रोज थोड थोड मरतच असतात .
आयुष्य दिले देवाने जगण्यासाठी ,
पण मरणाच्या आशन्केन डरतच असतात !
******************************
पायातल्या काट्याने
फ़क्त पाय दुखावतो
मनातल्या काट्याने
पूर्ण माणूस विव्हळतो
******************************
आयुष्य जर देव
देतो जगण्यासाठी
तर का ह्रदय तडपडत
तिच्या जाण्यानी
******************************
रोजच्या मरन्यापेक्षा
एकदा मेलेलं बरं
आयुष्यातून उठण्या अगोदर
आयुष्यातून गेलेलं बरं
******************************
प्रेम करणार तू
अन त्रास मनाला
दगा देणार ती
अन दोष देवाला
******************************
ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा