नेहमी भरतो
तू तर केवळ
वीजचोरीचा मार्ग अवलंबतो
******************************
पर्वत म्हणजे तरी काय
असते ते एक वॄक्षांचे ताटवे
कुणी वॄक्ष मोठे तर
कुणी रोपटे छोटे
******************************
वृक्षावर उगवतात
केवळ फळ आणि फूले
ही सर्वच आहेत ना
पर्वताची मुले
******************************
इथे छोटं असण्याचे
फायदे बरेच आहेत
मोठयांच्या जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत
******************************
छोटे मोठे असा वाद नाही
मोठ्यांना ही छोट्यांकडून
शिकता येते हयात
माझी काही शंका नाही
******************************
माझा श्वास तर केवळ
तुझ्या मनात दरवळतो
मी तर तू दिलेल्या
श्वासातूनच जीवन जगतो
******************************
आयुष्य माझे फुलण्यासाठी
तुझा श्वासोश्वास झाला
तुझ्यासाठी तर मी
हवेतला प्राणवायूही त्यागला
******************************
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा