पानी अलवावरचे
रित्या मनाची करून ओंजल
जमतील तितुके वेचायचे
तू आणि तुझीच आठवण
आता आहेत साथीला
तुझ्यामुलेच फुटलेत पंख
मनातल्या प्रीतिला
क्षण सरून गेलेले
आज आठवती पुन्हा
जुन्या आठवांची जखम
देई दर्द पुन्हा पुन्हा
कळत नकळत आयुष्यात
खुप काही घडून जात
अलवावरचे पाणी देखिल
अलगद ओघलून जाते
येती भरून आकाशी
पावसाळी हे ढग
किती साहू रे मी सख्या
तुझ्या विरहाची धग.
होती लाही लाही झालेली तिची काया
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला
मी मुक्त कलंदर यात्री
जगी हास्य वाटणारा
सांडून दुःख माझे
सर्वांस हसवणारा
सये रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणीचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुला आठवायचा वेडा छंद.
हा खेळ प्राक्तनाचा
कधी कुणा न कळल़ा
कुणा मिळते सुख पांघराया
कुणी फ़क्त दु:ख ल्याला
हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला
तुझा माझा प्रत्येक क्षण
अजुन आठवांत आहे
तू परतून येशील पुन्हा
ही आस मनात आहे
हर्ष